महाराष्ट्र
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे महिला वाचन कट्टा उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी :-
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे आज दिनांक एक फेब्रुवारी 2025 रोजी महिला वाचन कट्टा क्रमांक आठ उत्साहात झाला.
या वाचन कट्टा वेळी उपस्थित महिलांनी आपण वाचलेल्या पुस्तकावर उत्तम सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांचा हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला . यावेळी प्रत्येक महिला सखीला वाण म्हणून पुस्तक भेट देण्यात आले. वाचन कट्टा सखीनी ग्रंथपाल मयुरी नलवडे सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेच्या ग्रंथपाल पदी निवड झालेबद्दल यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. साधना जोशी औदुंबर यांनी भूषविले.संयोजन सौ. प्राजक्ता कुलकर्णी व सौ.विद्या निकम यांनी केले.