महाराष्ट्र
जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या कडून स्व अनिल भाऊ बाबर यांना अभिवादन

दर्पण न्यूज विटा :खानापूर आटपाडी मतदार संघाचे भाग्यविधाते स्व अनिल भाऊ बाबर यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन होता. या निमित्त विटा येथील आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून जनसुराज्य शक्ती पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा समित दादा कदम यांनी स्व अनिल भाऊ बाबर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी समित दादा कदम यांनी आमदार सुहास बाबर यांची भेट घेऊन स्व अनिल भाऊ बाबर यांच्या कार्याचा उजाळा केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.