सांगली जिल्हा नियोजन समितीची रविवारी सभा

दर्पण न्यूज सांगली :- जिल्हा नियोजन समितीची सभा उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्ताच्या कार्यवाही अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रम) कार्यक्रमांतर्गत दि. 24 जानेवारी 2025 अखेरच्या खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रम) मधील पुनर्विनियोजनबाबत, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, अशी या सभेची विषयसूची आहे.