भिलवडी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी :-
समाज बिघडला अशी सर्वत्र ओरड सुरू असते.पण कोणताच घटक त्याची जबाबदारी घेत नाही. समाजात नव परिवर्तन घडवायचे झाल्यास शिक्षकांनी समाज शिक्षक बनून पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन तासगांव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल पाटील यांनी केले.भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे होते.
प्रारंभी गिरीश चितळे यांच्या हस्ते सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये व कर्तव्ये रुजविण्याचे प्रयत्न शिक्षकांनी जाणीवपूर्वक करावेत.स्पर्धेच्या युगात टिकणारा विद्यार्थी घडवायचा असेल काळानुसार बदल स्वीकारण्यासाठी तयार राहावे लागेल असे आवाहन गिरीश चितळे यांनी केले
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले, संचालिका सौ.लीना चितळे,संचालक महावीर वठारे,प्रा.धनंजय पाटील,सदाशिव तावदर, संभाजी सूर्यवंशी,चंद्रकांत पाटील,प्रा.अजय चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी,
इंग्लिश मिडीयम स्कूल,खाजगी मराठी प्राथमिक शाळा,इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, सेमी इंग्लिश स्कूल,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी या भिलवडी शिक्षण संस्थेच्या शाखेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम,सामूहिक कवायत,संचलन सादर केले. बाबासाहेब चितळे सभागृहात संस्थेच्या विविध शाखेतील पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.मनिषा पाटील व संजय पाटील यांनी केले.आभार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी मानले.
यावेळी प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे,
मुख्याध्यापक संजय मोरे,सुकुमार किणीकर, प्रा.एम.आर.पाटील,विद्या टोणपे, स्मिता माने,सुचेता कुलकर्णी,श्रेयस पाटील आदी उपस्थित होते.