जवाहर नवोदय विद्यालयात गुणवत्ता पूर्ण शिक्षण : गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे
नवोदय विद्यालयात पराक्रम दिन साजरा

दर्पण न्यूज पलूस:-
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे सुभाष चंद्र बोस जयंती प्रित्यर्थ पराक्रम दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरचे उपप्राचार्य आर पी कदम उपस्थित होते.
यावेळी बोलताना पलूस चे गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे म्हणाले. जवाहर नवोदय विद्यालय मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण येथे दिले जाते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. आपल्या विद्यार्थ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड होऊन त्यांनी देशसेवा करावी अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. कोणत्याही शासकीय परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या यशात तासगाव तालुका आघाडीवर असल्याचेही ते म्हणाले. अध्ययस्थानाववरून बोलताना आर पी कदम सर म्हणाले की नवोदय विद्यालयाची सुरुवात आमच्या किर्लोस्कर शाळेतून झाली आहे. यापुढे लागेल ते सहकार्य आम्ही करू.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय प्रथम क्रमांक, पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस द्वितीय क्रमांक, अकॅडमिक हाय हायस्कूल कुंडल ने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
स्वागत प्रास्ताविक प्राचार्य अनिल कांबळे यांनी केले. यावेळी सदाशिव बोभाटे, कटारे साहेब, उपस्थित होते स्पर्धेचे संयोजन नितीन लोणकर,उमा जोशी ,शबाना मुल्ला,योगेंद्र देवरस, एस एच कांबळे, पूर्वा जोशी यांनी केले यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार महेश निकम सर यांनी मानले.