सांगली येथे 30 रोजी रोजगार मेळावा

दर्पण न्यूज सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व वसंतदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा गुरुवार, दि. 30 जानेवारी 2025 रोजी, सकाळी 10 वाजता वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च, भारती हॉस्पीटल जवळ, वानलेसवाडी, सांगली येथे होणार आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या मेळाव्यात 500 पेक्षा अधिक पदांकरिता जिल्ह्यातील नामांकित अशा 10 पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असणार आहे. दहावी, बारावी, आय. टी. आय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी विविध पदांकरिता, विविध उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे आपला ऑनलाईन सहभाग नोंदवावा. गुरुवार, दि. 30 जोनवारी रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना, सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन प्रती सोबत घेऊन याव्यात. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2990383 येथे संपर्क साधावा.