सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने 100 रुपयात 100 दिवाळी अंक वाचा : अध्यक्ष गिरीश चितळे

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 100 रुपयात 100 दिवाळी अंक वाचा हा वाचन वृद्धी करणारा अभिनव उपक्रम याही वर्षी राबविण्यात येणार आहे , अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे आणि कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली आहे.
गिरीश चितळे यांची सांगितले की, गेली वीस वर्षे वाचनालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो सभासदांनी शंभर रुपये भरून सलग सहा महिने दिवाळी अंक वाचण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते जे ग्रामस्थ सभासद नाहीत त्यांना अनामत म्हणून दोनशे रुपये ज्यादा भरून या योजनेत सहभागी होता येते साहित्य बालसाहित्य कृषी शिक्षण क्रीडा महिला विश्व पर्यावरण विज्ञान विनोदी साहित्य रहस्य साहित्य रहस्य कथा आधी विषयांवरचे महाराष्ट्रातील दर्जेदार वाचनीय दिवाळी अंक या योजनेतून सभासदांना देण्यात येणार आहेत यावर्षी 31 ऑक्टोबर 2024 रोजी वाचनालयाच्या सभागृहात दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे या दिवाळी अंक उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सभासदांनी ग्रामस्थांनी सहभागी व्हावे व दिवाळी अंक वाचण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन गिरीश चितळे आणि सुभाष कवडे यांनी वाचनालयाचे वतीने केलेले आहे.