ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेंतर्गत शनिवारी सनद वाटप कार्यक्रम

दर्पण न्यूज सांगली : स्वामित्व योजनेंतर्गत दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी मा. प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राष्ट्रीय मालमत्ता पत्रक/ सनदेचे ई वितरण कार्यक्रम होणार असून, जिल्हास्तरावरील कार्यक्रम ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एस. पी. सेठिया यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी अंतर्गत स्वामित्व योजनेच्या मालमत्ता पत्रक/ सनद वितरण ग्रामपंचायतीमध्ये पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम व स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटपाचा हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील स्वामित्व योजनेतील लाभार्थी यांना सनद वितरीत केली जाणार असून स्वामित्व योजनेचे महत्त्व याबाबत सादरीकरण केले जाणार आहे.