सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली पलूस तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री सुरज शेख यांच्या हस्ते विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर माझी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गायकवाड सर यांचे हस्ते राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वाचनालयाचे वाटत कार्यक्रमाचे संयोजन कार्यवाहक सुभाष कवडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तसेच विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या जीवन कार्याविषयी संक्षिप्तपणे माहिती सांगितली यावेळी वाचनालयाचे विश्वस्त जीजी पाटील ज्येष्ठ संचालक जयंत केळकर रमेश पाटील हनुमंतराव दिसले तसेच वाचक आणि साने गुरुजी संस्कार केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी जयंत केळकर यांनी आभार मानले: कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे आणि लेखनिक विद्या निकम माधव काटेकर यांनी केले.