अवकाश संशोधनातून देशसेवेची मोठी संधी ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड
सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी, (इस्रो) आणि विज्ञान भारतीची आंतरिक्ष महायात्रा (स्पेस ऑन व्हील) संपन्न
भिलवडी :
अवकाश संशोधनात भारत देशाची कामगिरी सर्वोत्तम अशी आहे,अवकाश संशोधनाच्या माध्यमातून देशसेवेची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले.अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी,भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि विज्ञान भारती यांचे संयुक्त विद्यमाने आंतरिक्ष महायात्रा (स्पेस ऑन व्हील) संपन्न.अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.लीना चितळे होत्या.मोहन गायकवाड म्हणाले की,सांगली जिल्ह्यातील विविध शाळांतील लाखांवर विद्यार्थ्यांनी आंतरिक्ष महायात्रेचा लाभ घेतला आहे. विद्यार्थ्याची अवकाश संशोधनाशी मैत्री निर्माण करण्याचे काम होत आहे.भविष्यात नवनवीन संशोधक निर्माण होणे गरजेचे आहे.
यापुढे बोलताना सौ.लीना चितळे म्हणाल्या की,तुम्हाला पडलेल्या विविध प्रश्नांवर संशोधन करा,पुस्तकांशी मैत्री करा,शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन घेत तुम्ही नवनिर्मिती करा.
विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्रचे प्रांत कार्यवाह कौस्तुभ साखरे,
एस.जी.कुलकर्णी संपर्क प्रमुख,मंदार वर्तक,ईशा कुलकर्णी आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.भिलवडी शिक्षण संस्थेचे महावीर वठारे,भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सीमा शेटे,संस्था सचिव मानसिंग हाके,मुख्याध्यापक संजय मोरे,उपमुख्याध्यापक विजय तेली,पर्यवेक्षक विनोद सावंत,प्रा. जी.एस.साळुंखे,,प्रा. डी.एच. जगदाळे,प्रा.जी.बी.पाटील,प्रा. एम.आर.पाटील,सुकुमार किणीकर,सागर कदम,धनंजय भोळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक संजय मोरे यांनी केले.सूत्रसंचालन टी. एस.पाटील यांनी केले.आभार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी मानले.