रिपब्लिकन दिनदर्शिका चे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त “रिपब्लिकन दिनदर्शिका” प्रकाशित करण्यात आली. दिनदर्शिकेचे प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी विशाल तिरमारे करत असलेल्या सामाजिक कामाचे तोंड भरून कौतुक केले व असेच समाज उपयोगी सामाजिक राजकीय काम करत रहा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तरुण कार्यकर्त्याचे संघटन करून पक्ष संघटना मजबूत करा अशा सूचना नामदार रामदासजी आठवले यांनी विशाल तिरमारे यांना दिल्या.
यावेळी बोलताना आरपीआयचे विशाल तिरमारे म्हणाले की, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही “रिपब्लिकन दिनदर्शिका” छापत असतो. जवळपास पाच हजार प्रति या गोरगरीब जनतेला मोफत वाटण्यात येतात. केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक चळवळ करून देशातील सर्वोच्च सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर केंद्रीय मंत्री होण्याचा मान मिळवला आहे.त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव व्हावा तसेच रिपब्लिकन पक्ष व पक्षाची भूमिका घराघरात पोहोचावी या उद्देशाने “रिपब्लिकन दिनदर्शिका” छापण्यात आली आहे. दिनदर्शिका छापण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बरेच हितचिंतक साथ देत असतात त्या सर्वांचे आभार आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल तिरमारे यांनी मानले.