आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेचे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

शाळेचे नेटके नियोजन : विद्यार्थ्यांचा जोमाचा सहभाग

 

 

भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल, भिलवडी येथे शनिवार दि.२१/१२/२०२४ रोजी वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात झाले.

. भव्य स्टेज, दिमाखदार सजावट,मुलांचा उत्साह व पालकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच शोभा आली. स्नेहसंम्मेलनामध्ये प्रत्येक मुलाचा सहभाग असणे व सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी लिलया सांभाळलेली सूत्रसंचालनाची धुरा प्रशंसेची बाब ठरली. पाश्चात्य संगीता बरोबरच , पारंपारिक नृत्य व स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वारसा जपणाऱ्या लेकींनी पहिल्यांदा शिक्षण घेताना सोसलेला जाच दाखविणारी मराठी नाटिका ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” व चिमणीचे घरटे बांधण्यासाठी असणारी धडपड दाखविणारी इंग्रजी नाटिका ” Homeless Sparrow”, देशभक्ती पर गीत इत्यादी विविध कार्यक्रमांतून मुलांनी आपल्या अंगी असणाऱ्या विविध गुणांचे दर्शन घडविले व सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी सिनियर के.जी.मधील विद्यार्थ्यांनींचे आजी सौ . जहीदा गणी मुल्ला व आजोबा श्री. गणी बादशाह मुल्ला हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत ,मुलांच्या सभाधीटपणाचे कौतुक केले व शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमासाठी इंग्लिश प्रायमरी व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे टीचर, ,वार्ताहर व सर्व शिक्षक ,सेवक वर्ग तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सौ.मिनाक्षी चौगुले टिचर यांनी केले व आभार सौ.मनिषा बाबर टिचर यांनी मानले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!