चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योगपती गिरीश चितळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक वाचनालय भिलवडीस दिली साठ हजारांची देणगी

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे चितळे उद्योग समूहाचे संचालक आणि वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी त्यांच्या 52 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचनालयास अभ्यासिका अध्यायावत करण्यासाठी साठ हजार रुपयांची देणगी दिली.
या बहुमोल देणगी बद्दल वाचनालयाच्या विशेष सभेत ज्येष्ठ संचालक भू. ना. मगदूम सर आणि रमेश सखाराम पाटील यांचे हस्ते त्यांचा शाल आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भू. ना. मगदूम सर यांनी मनोगत व्यक्त करून गिरीश चितळे यांचे खास अभिनंदन केले. याच कार्यक्रमात वाचनालयात बसविण्यात आलेल्या नवीन संगणक प्रणालीचा शुभारंभही गिरीश चितळे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी संगणका द्वारे क्लिक करून गजानन माने यांना पुस्तक देवघेव उपक्रमातील पुस्तक देण्यात आले. वाचनालयाचे सर्व कामकाज पुस्तक देवघेव, हिशोब पत्रके ,पत्रव्यवहार, पुस्तक नोंदी संगणक प्रणालीवर सुरू झालेले आहे. ही संगणक प्रणाली सुरू करणे बाबत भूतपूर्व अध्यक्ष काकासाहेब चितळे यांनी वेळोवेळी प्रेरणा देऊन सूचविलेले होते. त्याची अंमलबजावणी आज झाल्यामुळे सर्व वाचनालय परिवारास आनंद झाल्याचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक भाषणात सांगितले. यावेळी संगणक प्रणालीस बहुमोल सहकार्य करणाऱ्या चितळे उद्योग समूहातील सेवक शशिकांत कुलकर्णी, गजानन माने, मुजावर साहेब, शरद कुलकर्णी, विराज फडणीस, वैभव पाटील या सेवकांचा वाचनालयाचे वतीने ग्रंथ भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. जेष्ठ संचालक श्री जयंत केळकर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त गिरीश चितळे यांचे हस्ते ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी केळकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक हजार दोनशे पन्नास रुपयांची देणगी वाचनालयास जाहीर केली. हणमंतराव डीसले यांनी आभार मानले. वाचनालयाचे विश्वस्त जी. जी. पाटील गुरुजी, सर्व संचालक वाचक व सभासद उपस्थित होते,
लवकरच वाचनालयाची अभ्यासिका अद्यावत करून ती गरजू विद्यार्थ्यांसाठी पूर्ण दिवस उपलब्ध करून देण्याचा मानस अध्यक्ष गिरीश चितळे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल वामन काटेकर ,सौ. मयुरी नलवडे, सौ. विद्या निकम, माधव काटेकर यांनी केले . वाचक उपस्थित होते .