रयत शिक्षण संस्थेचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर, बुर्ली “नॅक”साठी सज्ज ; शुक्रवारी नॅक समिती पाहणी करणार

पलूस ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर, बुर्ली “नॅक”साठी जोरदार तयारी केली असून त्यासाठी सज्ज झाले असून शुक्रवार दिनांक 20 रोजी नॅक(NAAC) समिती पाहणी करणार आहे, अशी माहिती प्राचार्या उज्ज्वला पाटील यांनी दिली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे की बापू जाधव, उपप्राचार्य काकासाहेब भोसले, रयत शिक्षण संस्थेचे इस्पेक्टर , अंथोनी डिसोझा आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्या उज्ज्वला पाटील यांनी सांगितले की, नेहमीच रयत शिक्षण संस्थेने गुणात्मक दर्जा आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. उद्या शुक्रवार दिनांक 20 रोजी रयत शिक्षण संस्थेचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर, बुर्ली नॅक पात्रतेसाठी सज्ज झाले असून तज्ञ समिती महाविद्यालय पाहण्यासाठी दाखल होणार आहे. यासाठी महाविद्यालयाने सर्व ती तयारी केली आहे. यामध्ये अध्ययन आणि अध्यापन संशोधन, महाविद्यालय भौतिक सुविधा, कौशल्य , विद्यार्थ्यांने यश, मॅनेजमेंटचा सहभाग, पालक, विद्यार्थी – विद्यार्थिनी , माजी विद्यार्थी, संचालक यांचा सहभाग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्या ंच्या कल्याणकारी योजना आदी गोष्टींचा समावेश होणार आहे. या महाविद्यालयामध्ये 11 रिसर्च पेटंट आहेत, तर 61 विविध कोर्सेस आहेत, महाविद्यालयाच्या निकालामध्ये वाढ होत आहे. विद्यार्थी ही विविध पदावर गरुड झेप घेत आहेत.
नॅक साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पाहणी केली जाते. त्याची प्रत्यक्ष पाहणी म्हणून उद्या शुक्रवार दिनांक 20 रोजी नॅकची समिती पाहणी करण्यासाठी येणार आहे, या नॅकच्यासाठी आमदार डॉ विश्वजीत कदम, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते जे के बापू जाधव, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले, असेही पाटील यांनी सांगितले.