पलूसच्या तहसीलदार यांची भिलवडीतील पूरपट्ट्या भागास भेट : नागरिकांना दिला धीर

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी गावाला नेहमीच महापुराचा तडाका बसतो. यामुळे पूर पट्ट्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीला बरेच पाणी वाढू लागले. त्यामुळे आज मंगळवार दिनांक 23 रोजी पलूसच्या तहसीलदार दिप्ती रिटे यांनी भिलवडीतील पुरपट्ट्यातील भागांना भेट दिल्या. तसेच स्थानिक नागरिकांना आपल्याला शासन नेहमी सहकार्य करेल, असे आश्वासन देऊन धीर दिला.
भिलवडी गावाला 2019 च्या महापुराने विळखा घातला होता. भिलवडी बरोबरच परिसरातील अनेक गावांनी महापुराचा तडाका बसला होता, गेल्या काही दिवसापासून पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठी असणाऱ्या माणसांमध्ये सतत पाऊस असल्याने भीती निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर पलुस च्या तहसीलदार दीप्ती रिटे यांनी भिलवडी येथील मौलाना नगर आणि इतर भागांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान तहसीलदार यांनी स्थानिक नागरिकांशी विचारपूस केली, शासन महापूर काळात नेहमीच आपल्याला सहकार्य करेल, आपण लोकांनी सतर्कता बाळगली पाहिजे, कुठलीही अडचण आल्यास ताबडतोब प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.
यावेळी माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांनीही गेल्या काही वर्षापासून महापुराचा अनुभव असलेचे सांगून महापुरातील काळात गरिकांनाक्ष सुरक्षित स्थळी येण्यासाठी प्रशासनाने चांगली व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या.
यावेळी पत्रकार अभिजीत रांजणे यांनीही तहसीलदारांची चर्चा करून लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याची विनंती केली. माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी महापूर काळात मोठ्या प्रमाणात मदत केल्याचे सांगितले.