आईवडील दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देणारे असावेत : प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे;
भिलवडी खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

लढाया नव्हे तर माणस कशी घडली हे इतिहासाकडून शिकावे – प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे; खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
भिलवडी :-
लढाया कशा झाल्या हे नव्हे तर माणस कशी घडली ते इतिहासाकडून शिकता आले पाहिजे.शिक्षणातून घडणारा माणूस संस्कारक्षम बनवायचा असेल तर आईवडील दीपस्तंभा प्रमाणे प्रेरणा देणारे असावेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांनी केले.
अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी च्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते. रांगोळी,हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या बालकुंज हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात
आले.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते एम.पी.एस. सी.परीक्षेत महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत मुलीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेली विद्यालयाची माझी विद्यार्थिनी शैलजा चव्हाण यांचा तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाले बद्दल सौ.जयश्री घोडके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे विश्वस्त जे. बी.चौगुले,संचालक गिरीश चितळे, डी.के.किणीकर,संजय कदम,डॉ.सुनिल वाळवेकर,व्यंकोजी जाधव,सचिव मानसिंग हाके,प्राथमिक विभाग प्रमुख प्रा. मनिषा पाटील,डॉ.भालचंद्र कुलकर्णी,प्रा. एम.आर.पाटील,माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरैय्या तांबोळी,भिलवडी ग्रामपंचायत सदस्या सौ.सीमा शेटे, जयांट्स सहेलीच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर, चोपडेवाडी गावच्या पोलीस पाटील सौ.रेखा यादव,प्राजक्ता कुलकर्णी,छाया गायकवाड,अलका हसबनीस,जयश्री कुलकर्णी आदींसह पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.सौ.संध्याराणी मोरे यांनी अहवाल वाचन केले.प्रगती भोसले यांनी पारितोषिक वितरण सूत्रसंचालन केले.करिश्मा तांबोळी यांनी बालकुमार हस्तलिखिता विषयी माहिती दिली. शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले.संजय पाटील यांनी आभार मानले.