वांगी येथे आमदार डॉ विश्वजीत कदम डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., वांगी येथे गळीत हंगाम 2025-26 च्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा

दर्पण न्यूज कडेगांव / वांगी :-
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., वांगी येथे गळीत हंगाम 2025-26 च्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न झाला. यापूर्वी या कारखान्याचे जनक स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या स्मृतिस्थळास पुष्प अर्पण करून अभिवादन केले व आशीर्वाद घेतले.
सहकाराच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांचे जीवनमान उंचावणे, त्यांनी हे स्वप्न समोर ठेऊन कारखान्याची स्थापना केली होती आणि तो वारसा आम्ही सर्वजण पुढे चालवत आहोत. या कारखान्याचा विकास म्हणजे परिसरातील शेतकरी, ऊस उत्पादक व कामगार यांच्या प्रगतीचा मार्ग आहे.
या प्रसंगी आदरणीय आ. मोहनशेठ दादा कदम, पत्नी सौ. स्वप्नाली कदम, कारखान्याचे संचालक मंडळ,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,कर्मचारी,कामगार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशिर्वादाने हा कारखाना अधिक सक्षम, आधुनिक व प्रगतिशील होईल, अशी खात्री आहे.