संविधानाची विटंबना करणाऱ्या परभणी येथील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित अटक करा : अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा बंदची हाक देणार ; जमीर शेख

सांगली : सांगली जिल्हा भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने प्रांताधिकारी दिघे साहेब यांना परभणी येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून निवेदन घेण्यात आले. यावेळी प्रांताधिकारीने तातडीने वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना प्रांताधिकारी दिघे साहेब यांनी सांगितले
यावेळी जमीर शेख यांनी परभणीतील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या व जाती जातीमध्ये भांडणे लावून महाराष्ट्र मध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारावर देशद्रोहाचे गुन्हा दाखल करून व या मागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित कारवाई करावी तसेच कोंबिंगऑपरेशनच्या नावाखाली पोलिसाने निर्दोष दलित तरुणाना मारहाण व खोटे गुन्हे दाखल करू नये असे सांगली जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जमीर शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते.