महाराष्ट्र
भिलवडी येथील मंगलदीप मेडिकलचा 25 वा वर्धापन दिन उत्साहात ; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
ग्राहक, हितचिंतकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केला शुभेच्छाचा वर्षाव

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील मंगलदीप मेडिकलचा 25 वा वर्धापन दिन अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. मंगलदीप मेडिकलचे मालक सचिन नावडे यांची आपल्या व्यवसायाविषयी असणारी चिकाटी खरोखरच नव उद्योजकांना प्रेरणादायी ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
भिलवडी येथील मंगलदीप मेडिकलच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी पासून ते रात्री पर्यंत ग्राहक, हितचिंतकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी मंगलदीप मेडिकलचे मालक सचिन नावडे यांनी येणाऱ्या प्रत्येक हितचिंतक आणि उपस्थितांचे स्वागत करून विशेष भेट वस्तू दिली.
या मेडिकल व्यवसाय वाढीसाठी आई, वडील, भाऊ, मुले, मुलगी, कर्मचारी, ग्राहकांनी केलेल्या सहकार्याचे मालक सचिन नावडे यांनी आभार मानले.