शाहूवाङी तालुक्यातील “बांबवङे आणी साळशी येथील दोन ग्रामपंचायत अधिकार्यानां 5 हजार रूपयांची लाच घेतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांचे सासरे यांचा मृत्यूचा दाखला व सासरे यांचे बांबवडे, तालुका. शाहूवाडी, येथील राहते घराचा घरटान उतारा देणेकरिता सचीन बाळकूष्ण मोरे वय 44 पद ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत परखंदळे व बांबवङे .ता. शाहूवाङी .जिल्हा. कोल्हापूर.सध्या राहाणार.जूने पारगाव.ता. हातकणंगले. जिल्हा कोल्हापूर.यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम 20,000/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000/- रुपये ची मागणी केली .मोरे यांचे सांगण्यावरून प्रथमेश रविंद्र ङंबे वय 22 ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत साळशी’ पिशवी तालूका शाहूवाङी जिल्हा कोल्हापूर. रा. जूणे पारगाव.ता. हातकणंगले.जिल्हा कोल्हापूर. यांनी तक्रारदार यांचेकडून 5000/-₹ लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून दोन्ही आरोपी यांचेविरुद्ध शाहूवाडी पोलीस स्टेशन जि. कोल्हापूर, येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली – पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला ,
पो.हवा, अजय चव्हाण ,
पो.ना , सुधीर पाटील
पो.कॉ. कृष्णात पाटील
चा.सहा.फौ.कुराडे
यांनी सापळा रचून केली.