वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथे सांत्वनपर भेटी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- कागल शहरातील साजीद मुजावर यांचे वडील कै. दिलावर मुजावर यांचे दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने आज त्यांच्या निवासस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांनी भेट देऊन मुजावर कुटुंबीयांचे सांत्वन केले.*
*यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर आदी उपस्थित होते.
दरम्यान, कागल मुस्लिम जमीयतचे संचालक गौसमहमद नदाफ सर यांचा मुलगा कै.डॉ.समीर नदाफ यांचे दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने आज त्यांच्या निवासस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांनी भेट देऊन नदाफ कुटुंबीयांचे सांत्वन केले.
*यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, नवल बोते, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर आदी उपस्थित होते.