क्रीडामहाराष्ट्रसामाजिक

गोकुळ दूध संघाच्यावतीने कोल्हापूर ’जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार

 

दर्पण न्यूज कोल्हापूर, अनिल पाटील :- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत खेळाडूंचा तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचा सन्मान सोहळा गोकुळ दूध संघ प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे उत्साहात पार पडला. क्रीडा क्षेत्रात यश संपादन करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, खेलो इंडिया स्पर्धा, महाराष्ट्र कब्बडी संघात निवड, राष्ट्रीय हॉकी संघामध्ये निवड, राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धा व राष्ट्रीय खो-खो संघात निवड झालेल्या व राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवलेल्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच या खेळाडूंच्या यशामागे मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचाही गोकुळ दूध संघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “गोकुळ दूध संघाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही महत्त्व दिले आहे. खेळाडू म्हणजे समाजाचा अभिमान असून त्यांच्या यशामागे सातत्य, कठोर मेहनत व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असते. गोकुळने आजवर अनेक जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले असून पुढील काळातही जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. क्रीडा क्षेत्रातून सक्षम व शिस्तबद्ध पिढी घडवणे हेच गोकुळचे उद्दिष्ट आहे.”
यावेळी गुणवंत खेळाडू कु. गौरव पाटील, (कोपार्डे), कु. शेखर म्हमुलकर (साळवाडी), कुमारी माधवी जाधव (मणदूर), कुमारी सुहाना जमादार (कागल), कु. हर्षवर्धन पाटील (आमजाई व्हरवडे) व कु.सिध्दार्थ पाटील (गुडाळ) तसेच डी.सी. नरके विद्यानिकेतन चे राष्ट्रीय खेळाडू शिवम पाटील (वाशी), आयुष पाटील (सडोली खा.), श्रेयश मालाई (कोल्हापूर), प्रवीण पाटील (कोदे), अनुप पाटील (प्र.चिखली), यश तळेकर (खाटांगळे), वरद चव्हाण (कणेरी), वेदांत सुतार (सावर्डे बु.) तसेच क्रीडा प्रशिक्षक शिवाजी डुबल, सागर जाधव, दिपक चव्हाण, संजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी, क्रीडाप्रेमी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!