भिलवडी येथील इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा, बक्षीस वितरण उत्साहात
भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांची उपस्थिती

सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल मध्ये *वार्षिक क्रीडा स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात झाला.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूलमध्ये दिनांक २९/११/२०२४ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला.
वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. इयत्ता पहिली ते चौथी मध्ये डंबेल रेस, रनिंग रेस ,बॉल थ्रो, रनिंग, स्किपिंग व शॉट पुट असे विविध खेळ घेण्यात आले होते. तसेच इयत्ता पाचवी ते नववी मध्ये सुद्धा वैयक्तिक व सांघिक खेळ घेण्यात आले. पाचवी ते नववी पर्यंतचे सर्व विद्यार्थी दरवर्षी चार संघांमध्ये (मर्क्युरी ,व्हिनस, अर्थ,मार्स ) या चार विभागांमध्ये विभागले जातात. व सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या संघाला जनरल चॅम्पियनशिप दिली जाते.यावर्षी *मर्क्युरी* या संघाने *३०५* गुण मिळवून यावर्षीची चॅम्पियनशिप मिळवली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.भगवान पालवे साहेब उपस्थित होते.त्याचबरोबर संस्थेच्या संचालिका सौ.लीना चितळे, भिलवडी गावच्या सरपंच सौ.सीमा शेटे मॅडम , प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे टीचर उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले, प्रमुख पाहुणे श्री. भगवान पालवे सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुप्रिया पवार यांनी केले, स्वागत सौ.उज्वला हजारे यांनी केले .प्रास्तविक व पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापिका कु.विद्या टोणपे यांनी ,तर आभार सौ.किर्ती चोपडे यांनी मानले .या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.