कृष्णा ग्रामीण बिगर सह शेती पतसंस्थेची घोडदौड अत्यंत चांगल्या प्रकारे सुर : चेअरमन सुधीर भैय्या जाधव
कृष्णा ग्रामीण बिगर सह शेती पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

दर्पण न्यूज दुधोंडी वार्ताहर
सभासदासह ठेवीदार, कर्जदार व संचालक मंडळासह कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नानेच कृष्णा ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरु असून संस्थेची घोडदौड अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
दुधोंडी तालुका पलुस येथील कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मा जे के (बापू) जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा नेते क्रांतिकुमार (आबा) जाधव व युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली कृष्णा ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था या पतसंस्थेची संचालक मंडळाची व चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवड पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली, सुधीर भैय्या जाधव बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की नवनिर्वाचित संचालक मंडळ यांना सर्वसमावेशक कार्यभार ठेऊन येणाऱ्या काळात संस्थेच्या ठेवी कशा वाढल्या पाहिजेत व संस्थेचा उद्योग कसा वाढला पाहिजे यावर जास्त भर नवनिर्वाचित संचालकांनी दिला पाहिजे .या निवडीमध्ये चेअरमन पदी विजय रामचंद्र जाधव, व व्हा चेअरमन पदी विश्वास रामचंद्र आरबुने, यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.
यावेळी दिलीप तुकाराम जाधव, श्रीकांत भीमराव कदम, अनिल भगवान गायकवाड, नामदेव भगवान देसाई, अमोल प्रकाश नलवडे, सुदाम राजाराम ठीक, अभिजित सदशिव जंगम, विकास रामचंद्र तिरमारे, राजश्री रमेश नलवडे, वैशाली अशोक आरबुने, अंजली विकास भोसले, या नवीन संचालकांची निवड झाली पलुस उपनिबंधक कार्यालाच्या अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पवार यांनी काम पाहिले
या निवडी वेळी कृष्णा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे माजी चेअरमन रवींद्र आरबूने, माजी संचालक अभिजित पवार, अनिल नलवडे, रामचंद्र भोसले, सचिव शंकर जाधव क्लार्क शरद मोरे, हर्षद जाधव, संभाजी आरबूने, अमजद मुजावर व इतर मान्यवर उपथित होते.