कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी पाटीलची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

दर्पण न्यूज कडेगाव -: महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव येथील विद्यार्थिनी वैष्णवी नारायण पाटील हिने शालेय 17 वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण कडेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा बीड येथे दिनांक १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत वैष्णवीने उत्कृष्ट खेळ कौशल्य, मेहनत आणि संघभावना याच्या जोरावर महाराष्ट्र संघात स्थान पटकावले आहे.
या यशामागे विद्यालयाचे मार्गदर्शक प्राचार्य श्री. चव्हाण सर, उपमुख्याध्यापक श्री. रोकडे सर, पर्यवेक्षक श्री. भंडारे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. शेख सर, तसेच क्रीडाशिक्षक श्री. वैभव कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
वैष्णवीच्या यशाबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शुभेच्छुक, माननीय प्राचार्य, जनरल बॉडी सदस्य, स्कूल कमिटी सदस्य, सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा व भौतिक सुविधा नियमन समिती, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सेवकवर्ग यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
वैष्णवीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव यांचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर अधिक उज्ज्वल झाले आहे.


