महाराष्ट्रराजकीय

राजकारणात डॉ विश्वजीत कदम हा हिरा : खासदार इब्रान प्रतापगडी .

भिलवडी येथे डॉ विश्वजीत कदम यांचा प्रचार : अनेक दिग्गजांची विरोधकांवर फटकेबाजी

 

भिलवडी

महाराष्ट्र राज्यात डॉ विश्वजीत कदम हा हिरा आहे.महायुतीच्या भ्रष्ट सरकारला नामशेष करण्यासाठी आ .डॉ़ विश्वजीत कदम यांना बळ द्या.राज्यात महायुतीचे फसवे आणि भ्रष्ट सरकार असून यांना या निवडणुकीत नामशेष करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ दिले पाहिजे . आणि महाराष्ट्र राज्यात एक आ .डॉ विश्वासाचे आपलं सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देणारं शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आणण्यासाठी आ .डॉ .विश्वजीत कदम यांना मताधिक्य देऊन भरघोस मतांनी विधानसभेत पाठवा असे प्रतिपादन भिलवडी येथील आ .डॉ . विश्वजीत कदम यांच्या जाहीर प्रचार सभेत खासदार इब्रान प्रतापगडी यांनी व्यक्त केले .

यावेळी खासदार इंब्रान प्रतापगडी म्हणाले आ .डॉ .विश्वजीत कदम हा हिरा आहे हा हिरा तुमच्या हाताला लागलेला आहे . या हिरयाला चमकवण्याचे काम पलूस कडेगांवच्या जनतेने करावे आ .डॉ .विश्वजीत कदम यांच्यात एवढी धमक आहे की ते देशातील दोन खासदार निवडून आणू शकतात एवढी त्यांच्यात केपेसीटी आहे . ते तोला मोलाचा माणूस असल्याने देशात त्यांचे नाव आहे . आणि राज्यात हे नाव आहे .काँग्रेस पक्षात त्यांचे वजन आहे .काँग्रेस प्रचार यंत्रणेत स्टार प्रचारक कोणत्या ठिकाणी पाठवायाचे हे ते ठरीवतात . असे खमक्या नेतृत्व या मतदारसंघाला लाभले आहे .आ .डॉ . विश्वजीत कदम भविष्य काळात एक मोठ्या पदावर्ती जातील फक्त आमदार म्हणून निवडून न येता ते राज्यचे कॅबिनेट मंत्री होतील आणि देशाची सूत्रे हातात घेतली .महायुतीच्या सरकारने लोकसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आम्लात आनली पंधराशे रुपये देऊ करून लोकांना फसवण्याचे काम त्यांनी आज केले आहे .ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार आहे .परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये ‘सुशिक्षित बेरोजगारांना चार हजार रुपये ‘शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत ची कर्जमाफी ‘ सातत्याने कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत प्रेत्सान अनुदान दिलं जाणार आहे .हे महाविकास आघाडीचे सरकार फसवे नसून शब्दाला बांधील आहे .परंतु मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस या सरकारने अनेक महाराष्ट्राचे उद्योग पळवून गुजरातला उद्योग नेले आहेत .अनेक युवकांचा रोजगार त्यांनी पळविला आहे .फसवे आणि खोकेबाज सरकार नामशेष करून महाविकास आघाडीच्या सरकारला साथ द्या आणि विश्वजीत कदम यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून त्यांना विधानसभेत पाठवा असे मत खासदार इम्रान प्रतापगडी यांनी व्यक्त केले .
यावेळी कुणाल चौधरी ‘ आ अरुण लाड ‘ आ .डॉ .विश्वजीत कदम ‘ खा . विशाल पाटील यांची भाषणे झाली .

यावेळी खासदार विशाल पाटील ‘ आमदार अरुणां लाड ‘ माजी आमदार मोहनराव कदम ‘ जे .के. बापू जाधव ‘महेंद्र लाड ‘ कुणाल चौधरी ,राजू दादा पाटील ‘विजय चोपडे ‘सीमा शेटे ‘ राजश्री सावंत ‘ओंकार पाटील , चंद्रकांत पाटील ‘ बाळासो मोहिते ‘ धनंजय पाटील ‘ मोहन तावदर ‘ सतपाल साळुंखे, रमेश पाटील, बाळासो मोरे, ‘यांची प्रमुख उपस्थिती होती .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!