तुमचे-माझे हे स्वप्न साकारण्यासाठी मला विजयी करा : डॉ विश्वजीत कदम
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ कोतीज, घोटील, रामापूर, देवराष्ट्रे येथे बैठक आणि प्रचार : शेकडोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती

कडेगांव: गेल्या सहा वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये तब्बल बाराशे कोटींचा निधी आणून विकासकामे केली.तुमचे-माझे हे स्वप्न साकारण्यासाठी हाताच्या पंजा समोरील बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ कोतीज, घोटील, रामापूर, देवराष्ट्रे येथील बैठकीत केले. यावेळी अनेक गावांमध्ये डॉ विश्वजीत कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉ विश्वजीत कदम म्हणाले की, माझ्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील मायबाप जनतेने कायमच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून मतदारसंघात विविध विकासकामे करून दिलेला शब्द पूर्ण केला, याचे मोठे समाधान आहे. आणखी बरीच कामे करून आपला मतदारसंघ विकासाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे. तुमचे-माझे हे स्वप्न साकारण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. विकासकामांच्या माध्यमातून आपण दाखविलेला विश्वास नक्कीच सार्थ करून दाखवेन. भाजप व महायुती सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली आहे.काँग्रेस व महाविकास आघाडीने लोकसेवेची पंचसूत्री व जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला असून, राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचे सरकार आणण्यासाठी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
यावेळी शांतारामबापू कदम, संजय विभुते, जितेशभैय्या कदम , युवा नेते सतीश आबा पाटील,यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.