श्रीक्षेत्र औदुंबर येथे डॉ विश्वजीत कदम यांचा श्री दत्त प्रभूंचा आशिर्वाद घेऊन अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ
माजी मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रणिती शिंदे , आमदार अरुण आण्णा लाड, डॉ विश्वजीत कदम,संजय विभुते यांच्याकडून विरोधकांवर फटकेबाजी
औदुंबर ( मुख्य संपादक अभिजीत रांजणे)-:
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील श्रीक्षेत्र औदुंबर येथे पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी श्री दत्त प्रभूंच्या चरणी श्रीफळ फोडून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात केला.
यावेळी अनेक मान्यवरांनी डॉ विश्वजीत कदम यांच्या विषयी मोठ्या मताधिक्य मिळवून विजयी होतील, अशा व्यक्त केली.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी श्रीदत्त पादुकांचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी या निवडणुकीत पुन्हा घवघवीत यश मिळू दे, अशी प्रार्थना ‘श्रीं’च्या चरणी केली.
यावेळी डॉ विश्वजीत कदम म्हणाले की, सह वर्षांत पलूस-कडेगाव मतदारसंघासाठी बाराशे कोटींचा निधी आणून अनेक विकासात्मक कामे केली आहेत. आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास हाच माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद द्यावा. मतदार बंधू-भगिनी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विक्रमी मतांनी विजयासाठी आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहे, असेही पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी ऋण व्यक्त केले.
या वेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी कै. पतंगराव कदम साहेब यांच्या विचाराचा वासरा घेऊन डॉ विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगाव मतदार संघाचा विकास जोमाने केला. अनेकांचा मदत केली आहे. आज रोजी ते निवडून आले आहेतच. पुन्हा त्यांना मोठ्या मताधिक्य देऊन निवडून द्या, असे आवाहन पाटील यांनी केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पतंगराव कदम साहेब विठ्ठल भक्त होते, मी ही विठ्ठल भक्त आहे . डॉ विश्वजीत कदम यांचे काम तुमच्या मतदारसंघात खूप मोठं आहे. त्यामुळे आपण लोक भाजप सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका. लाडकी बहिण योजना बंद पडली आहे, महागाई वाढली आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी लोकांनी डॉ विश्वजीत कदम यांना निवडून द्या, असे सुळे यांनी सांगितले.
खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की , डॉ विश्वजीत कदम दादा यांनी महापूर कोरोना काळात लोकांना मदत केली आहे. भाजप सरकार गरिबांचे सरकार नाही. त्यामुळे आपण महाराष्ट्र राज्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी पुन्हा एकदा डॉ विश्वजीत कदम यांना निवडून द्या.
या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार मोहनराव (दादा) कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतराव पाटील (साहेब), संसदरत्न खा. मा. सुप्रियाताई सुळे, खा. मा. प्रणितीताई शिंदे, आ. मा. अरुण (अण्णा) लाड, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, रघुनाथकाका कदम, लोकनेते जे. के. बापू जाधव, शांतारामबापू कदम, महेंद्र आप्पा लाड, शिवसेना (ठाकरे गट), मा. संजय विभूते, शिवसेना नेते अभिजीत पाटील, पत्नी सौ. स्वप्नाली विश्वजीत कदम, सौ. पूजावहिनी विशालदादा पाटील, ज्येष्ठ समाजसेविका मा. ममता सिंधुताई सपकाळ, मा. जितेशभैय्या कदम, सरपंच सौ. राजेश्वरी सावंत, युवा नेते सतीश आबा पाटील, यांच्यासह कदम कुटुंबीय, काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
.