महाराष्ट्रराजकीय

कोल्हापूर जिल्हा लाकूड व्यापारी संघटनेचा कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकरांना जाहीर पाठिंबा

 

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील लाकूड व्यापाऱ्यांचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडून सोडवणूक करणा-या कार्यसम्राट आमदार प्रकाश आबीटकर यांना कोल्हापूर जिल्हा लाकूड व्यापारी संघटनेच्या वतीने विधानसभेसाठी जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, लाकूड व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केले. लाकूड व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी वनविभागाच्या जिल्हास्तरावर तसेच मंत्रालय स्तरावर मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन विविध प्रश्न शासन दरबारी मांडले. तुमच्यातील एक सहकारी बनून तुमचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या पुढील काळामध्ये देखील लाकूड व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आपणा सर्वांनी दिलेल्या पाठिंबाबद्दल सर्वांचा आभारी असल्याचे सांगितले.
यावेळी संघटनेचे गोविंद उर्फ आण्णा पिळणकर म्हणाले, लाकूड व्यापाऱ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे लाकूड व्यापाऱ्यांची मोठी फरपट होत होती. विविध प्रश्नांमुळे लाकूड व्यापारी मेटाकुटीला आले होते. अनेक जण व्यवसाय बंद करण्याच्या विचारात होते. मात्र आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्न मार्गस्थ लागले. त्यामुळे लाकूड व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणा-या आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा सर्वांनी निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी अरुणराव देवाळे, बापू दबडे, सागर देसाई, आबूताहेर तकीलदार, जयवंत धनवडे, उत्तम पताडे, रमेश राणे, संतोष शिंदे, उत्तम धावडे, बापू आगलावे, पिंटू गुरव, राजू सुतार, उत्तम जाधव, सचिन गुरव यांच्यासह भुदरगड, आजरा, राधानगरी तालुक्यातील लाकूड ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!