नानीबाई चिखली येथे तिरंगा पदयात्रा संपन्न

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- नानीबाई चिखली – भारताने ‘ऑपरेशन सिंदूर ‘ च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला भारतीय सैनिकांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी व भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद यात्रा काढण्यात आली नानीबाई चिखलीकरानी उत्स्फूर्त प्रतिसादाने तिरंगा पदयात्रेला
प्रतिसाद दिला.
हुतात्मा हरिबा बेनाडे याच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली.हुतात्मा हरिबा बेनाडे गल्ली,देवर्षी कॉर्नर, मेन रोड, शुक्रवार पेठ या मार्गावरून पदयात्रा सोमवार पेठ येथे आली.पदयात्रेत आजी माजी सैनिक आपल्या आर्मीचा ड्रेस घालून सहभागी झाले होते.तसेच पदयात्रेत लहान मुले,तरूण, महिला,वृद्ध तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व संस्थाचे पदाधिकारी, नेते,कार्यक्रत्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी सोमवार पेठ येथे पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पर्यटक तसेच शहीद सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.