कसबा वाळवे येथील महाराजस्व अभियानात ११०७ लाभार्थींना शासकीय लाभ

कोल्हापूरः अनिल पाटील
कसबा वाळवे ( ता. राधानगरी) येथे राबवण्यात आलेल्या महाराजस्व अभियानात ११०७ लाभार्थ्यांना शासकीय लाभ देण्यात आला.
शेतकरी ,सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान, पारदर्शक करण्याच्या उद्देशाने कसबा वाळवे येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविल्याचे तहसीलदार मीना निंबाळकर यांनी सांगितलं. हे अभियान महसूल विभाग राधानगरी यांनी राबवले. यावेळी महसूल कृषी आरोग्य एकात्मिक बाल विकास पोस्ट भूमि अभिलेख आदी विविध बारा शासकीय विभागातील स्टॉल उभारण्यात आले होते.
कसबा वाळवे येथे अभियानाचा शुभारंभ माजी सरपंच अशोकराव फराक्टे व सरपंच सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानासाठी नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर, मंडल अधिकारी
कुलदीप जनवाडे, अंकुश रानमाळे, रणजित ढोकरे, के के मोरे,भरत माळी,अनुष्का पाटील, पर्यवेक्षिका सुजाता सावंत, कृष्णात एकल, दिलीप आद्मापुरे, यांच्यासह कसबा वाळवे मंडळातील सर्व तलाठी, कोतवाल यांनी परिश्रम घेतलं.