भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य , भारत सरकार मान्यताप्राप्त राज्यव्यापी सामाजिक संघटना मध्ये ‘राज्य प्रदेश उप सचिव’ महाराष्ट्र राज्य पदी, मा. प्रशांत संगाप्पा वाघमारे साहेब यांची नियुक्ती

सांगली : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा. प्रशांत संगाप्पा वाघमारे यांनी गोरगरीब कष्टकरी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कायम एक पाऊल पुढे टाकून शासन दरबारी लढा उभा करून, श्रमिक कष्टकरी बांधकाम तसेच सर्व थरातील कामगार कर्मचारी यांना योग्य न्याय मिळवून दिला आहे म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेवून,
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष मा.भाऊसाहेब रघुनाथ कांबळे, जेष्ठ नागरिक यांनी, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील, कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारे, कामगार नेते मा. प्रशांत संगाप्पा वाघमारे यांना आणखी बळ मिळावे या करिता त्यांची भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य , भारत सरकार मान्यताप्राप्त राज्यव्यापी सामाजिक संघटना मध्ये ‘राज्य प्रदेश उप सचिव’ महाराष्ट्र राज्य पदी योग्य निवड करण्यात आली आहे.
याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून
पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.‘राज्य प्रदेश उप सचिव’ महाराष्ट्र राज्य पदी आपल्या निवड नंतर प्रतिक्रिया देताना मा. प्रशांत संगाप्पा वाघमारे म्हणाले की, शासकीय निमशासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला जात नाही, कोणतेही काम कार्यालयात घेऊन गेल्यास, अधिकारी, क्लार्क हे पैशाची मागणी करत असतात, मोठ्या प्रमाणावर शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत. खालच्या स्तरातून ते वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्या पर्यंत भ्रष्टाचार फोफावला आहे. यासाठी मा. भाऊसाहेब रघुनाथ कांबळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार , अन्याय, अत्याचार विरोधी लढा देण्यासाठी निर्माण केलेली एकमेव राज्यव्यापी सामाजिक संघटना म्हणजे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार मुळापासून उपटून नष्ट करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन या वेळी त्यांनी केले आहे.