पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांचा कडेगाव येथील प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल
श्रीमती विजयमाला कदम, माजी आमदार. मोहनशेठ (दादा) कदम, खासदार विशालदादा पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, लोकनेते जे के बापू जाधव व अनेक मान्यवरांची उपस्थिती

कडेगांव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस व महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी कडेगाव येथील प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
डॉ विश्वजीत कदम यांनी स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा जनसेवेचा वसा पुढे चालवत गेली पाच वर्षे आमदार म्हणून पलूस-कडेगाव मतदारसंघातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली. अनेक विकासकामे पूर्णत्वास नेली. जनतेचे प्रेम आणि आशीर्वादाने पुन्हा एकदा ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी डॉ विश्वजीत कदम सज्ज आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध आहे, असे डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
यावेळी मातोश्री श्रीमती विजयमाला कदम, माजी आमदार मा. मोहनशेठ (दादा) कदम, सांगली जिल्ह्याचे खासदार मा. विशालदादा पाटील, मा. डॉ. शिवाजीराव कदम, मा. शांतारामबापू कदम, मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक लोकनेते मा. जे. के. बापू जाधव, मा. महेंद्रअप्पा लाड, युवा नेते सतीश आबा पाटील, सौ. स्वप्नाली विश्वजीत कदम, मा. जितेशभैय्या कदम, ऋषिकेश भैय्या लाड, मा. दिग्विजयभैय्या कदम व कुटुंबातील अन्य सदस्य, कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे नेते, पलूस कडेगांव मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्ते , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.