महाराष्ट्र
म्हैसाळ, सलगरे चेकपोस्टवर जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
सांगली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जिल्ह्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे व पारदर्शी होण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क राहून कामकाज करीत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणी व सीमा भागात चेक पोस्ट उभारून तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज म्हैसाळ व सलगरे येथील चेकपोस्टची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांना सतर्क राहून कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोणताही हलगर्जीपणा न करता भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कामकाज करण्याच्या सूचना दिल्या.