महाराष्ट्र
केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना सांगलीच्या सचिन नावडे यांची जिल्हा स्वीकृत संचालकपदी निवड
केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना सांगलीचे संचालक निलेश जाधव यांची बुलेटिन कमिटी चेअरमन पदी निवड

भिलवडी : केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटना सांगलीच्या सांगली जिल्हा संचालक मंडळाच्या मीटिंग झाली. या बैठकीत पलूस तालुक्याचे कार्याध्यक्ष, भिलवडी येथील मंगलदीप मेडिकलचे मालक सचिन नावडे यांची जिल्हा स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली.
तसेच भिलवडी येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना सांगलीचे संचालक निलेश जाधव यांची बुलेटिन कमिटी चेअरमन पदी* निवड करण्यात आली. या निवड प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीमुळे सचिन नावडे, निलेश जाधव यांचे कौतुक होत आहे तसेच अनेकांकडून अभिनंदनही करण्यात येत आहे.
तसेच भिलवडी येथे या निवड निमित्ताने दर्पण न्यूज चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बी डी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.