ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी जाहीर आवाहन : प्रदूषण विरहित सण उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करावा

भिलवडी : ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी क्षेत्रातील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक व फटाक्यांचा वापर करणारे नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, भारत सरकार, अधिसूचना क्रमांक G.S.R.682 (E) Date. ०५/१०/१९९९ अन्वये १२५ dB (AI) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री वापर करण्यास मनाई केली आहे. अशा फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाक्यांमध्ये बेरियम सॉफ्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी, यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास पूर्णतः बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात. हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत. तसेच जनहित याचिका क्र. १५२/२०१५ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम १८८४ आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम २००८ मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तरी फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करू नयेत. तसेच फटाक्यांची विक्री नगरपंचायतने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेवूनच करण्यात यावी.
तसेच ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा अभियान ५.० अभियानामध्ये ग्रामपंचायात सहभागी असलेने ग्रामसभा ठरावाप्रमाणे फटाकेमुक्त, प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक ग्रीन फेस्टिव्हल व प्रदूषण विरहित सण उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करावा. सदर अभियानांतर्गत नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा, प्लॅस्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा. सण समारंभामध्ये टाकावू वस्तूंचा (उदा. प्लासिटिक कप, पत्रावळी, द्रोण इ.) वापर टाळावा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करावा, पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी,
सण समारंभामध्ये लाउडस्पीकरच्च्या आवाजाची पातळी ही जागतिक आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार योग्य राखावी. ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी ने घोषित केलेल्या शांतता क्षेत्राच्या परिसरात हॉर्न, लाउडस्पीकर व फटाके वाजवण्यास मनाई आहे. तरी येणारा दिवाळी सण हरित व पर्यावरणपूरक दिवाळी सण म्हणून साजरा करूया, तसेच सर्वजन आनंदी व सुरक्षित राहो, अशा सर्वांना माझी वसुंधरामय हार्दिक शुभेच्छा….