आमदार जयंत पाटील, संग्राम देशमुख , सुहास बाबर यांच्यासह 15 उमेदवारी अर्ज दाखल
सांगली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 तिसऱ्या दिवशी 18 उमेदवारांची 24 नामनिर्देशन पत्रे दाखल

सांगली, : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी आज जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 18 उमेदवारांची एकूण 24 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. ही माहिती संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
तिसऱ्या दिवशी दाखल नामनिर्देशनपत्रांची व विक्रीची माहिती पुढीलप्रमाणे.
विधानसभा मतदारसंघाचे नाव | नामनिर्देशनपत्र दाखल संख्या | नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या व्यक्तिचे नाव व पक्ष |
281-मिरज (अ.जा.) | 03 | डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी)
मकरंद भागवत कांबळे (अपक्ष) ज्योती जयपाल कांबळे (अपक्ष) |
282-सांगली | 02 | धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी)
धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी) |
283-इस्लामपूर | 03 | निशीकांत प्रकाश पाटील (भारतीय जनता पार्टी)
जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) |
284-शिराळा | 03 | अजित रंगराव आलुगडे (अपक्ष)
सम्राट विजयसिंह शिंदे (अपक्ष) रवि भगवानराव पाटील (अपक्ष) |
285-पलूस-कडेगाव | 04 | संग्राम संपतराव देशमुख (भारतीय जनता पार्टी)
संग्राम संपतराव देशमुख (अपक्ष) प्रदिप विलास कदम (शिवसेना /अपक्ष) रविंद्र हरीबा ठोंबरे (अपक्ष) |
286-खानापूर | 04 | वैभव प्रतापराव पाटील (अपक्ष)
सुहास अनिलराव बाबर (शिवसेना) सुहास अनिलराव बाबर (शिवसेना) संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष) |
287-तासगाव-कवठेमहांकाळ | 01 | रोहित रावसाहेब पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) |
288-जत | 04 | विक्रमसिंह बाळासो सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस)
प्रकाश विठोबा जमदाडे (भारतीय जनता पार्टी) विक्रमसिंह बाळासो सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस) विक्रमसिंह बाळासो सावंत (अपक्ष) |
नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 असून नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 आहे.