जत विधानसभा मतदारसंघातून आ. विक्रमसिंहदादा सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल : आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती
जत येथे प्रचंड मोठी रॅली : कॉंग्रेस नेत्यांचीही उपस्थिती

जत ; सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रमसिंहदादा सावंत यांनी प्रचंड मोठी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम म्हणाले की, आ. विक्रमसिंहदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत जत तालुका हा विकासात अग्रेसर ठरला आहे. त्यांनी जत मतदारसंघातील पाणी व इतर प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडून मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. त्यांनी म्हैसाळ, तुबची बबलेश्वरच्या पाण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला आणि जत तालुक्याला पाणी मिळवून दिले. कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारा, जत मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत पुढे नेणारा कर्तबगार नेता आ. विक्रमसिंहदादा सावंत यांच्या रूपाने लाभला आहे.येणाऱ्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी, जत तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेने विक्रमदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवडून द्यावे. कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विक्रमसिंहदादांच्या विजयासाठी एकदिलाने काम करावे,असे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी खासदार विशालदादा पाटील, उमेदवार आ. विक्रमसिंहदादा सावंत यांच्यासह कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.