पलुस तालुक्यातील जुगार मटका यासह अवैद्य धंदे बंद करा ; आरपीआयची (आठवले गट) मागणी

पलुस : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील व तहसीलदार दीप्ती रिटे यांना पलूस तालुक्यात बेसुमार अवैद्य धंदे चालू असले बाबत निदर्शनास आणून देऊ देऊन अवैद्य धंद्यावरती कठोर कारवाई करावी याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशालभाऊ तिरमारे, उपाध्यक्ष शितल मोरे यांच्यासह शिष्टमंडळाने दिले. यावेळी कडेगाव तालुका उपाध्यक्ष भिकाजी मिसाळ, अजय कांबळे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पलूस पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मटका जुगार व देशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. मटका जुगार वाल्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची भीती उरलेली नाही. छोट्या – मोठ्या पत्र्याच्या खोक्यात उघड पणे मटका व जुगार खेळली जाते. पोलिसांची कोणतीही भीती जुगार धंदे वाल्यांना राहिली नाही. तरी पोलीस प्रशासनाकडून मटका – जुगार वाल्यांच्यावर तात्काळ कारवाईची अपेक्षा आहे.
त्याप्रमाणे आपल्या तालुक्यात गाजत असलेला अमली पदार्थ सेवन प्रकरनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पलूस मधील पानपट्टी धारकांच्या कडून मोठ्या प्रमाणात मसाले पानाच्या माध्यमातून तरुण मुला-मुलींना अमली पदार्थ विकले जातात. आपल्या हद्दीतील पानपट्टी धारकांची कसून तपासणी करून अमली पदार्थ जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.तसेच पलूस मधील खाजगी सावकारांनाही आळा बसावा अशा पद्धतीची कारवाई आपणाकडून व्हावी.
गावागावांमध्ये सुरू असणाऱ्या मटका जुगारावर कडक कारवाई करून हा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावा या व्यवसायामुळे गोरगरीब कुटुंबातील लोकांचे कौटुंबिक जीवन उध्वस्त होत आहे तरुण मुले जुगार मटका या धंद्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत यामुळे आपल्या पोलीस चे नाव भविष्यात खराब होण्याची दाट शक्यता आहे तरी सदर निवेदनाची दखल घेऊन अवैध्य व्यवसायावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी वेळप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने पलूस तहसील कार्यालयासमोर बेमुदत निदर्शने आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला.