मिरज येथे उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.

मिरज : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांचा वाढदिवस मिरज येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मिरजेतील महात्मा गांधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्या शनिवार पेठ येथील जनसंपर्क कार्यालय येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर अंतर्गत डोळे तपासणी,मोफत चष्मे वाटप,रक्त तपासणी यासह शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
तसेच मिरजेतील पाठक वृध्दाश्रम व अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेत फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अक्षय ब्लड सेंटर मिरज चे हजरत पखाली,डाॅ.जयदिप शिंदे,मयुरी हवालदार,हणमंत वाघमारे,रोहीत कदम तसेच दृष्टी हाॅस्पीटलचे अल्ताफ मुजावर, सुभान पटेल,आयुब पटेल,संभाजी फडतरे या टीमकडून या मोफत आरोग्य शिबीराचे नियोजन करण्यात आले.
यावेळी डाॅ.मंगळवारे,अनिल सुगण्णावर,किरण कांबळे,अभिजित रांजणे,सचिन इनामदार, महेबुब मणेर,किरण पाटील, स्वप्नील शिवशरण,रज्जाक चिक्कोडे दिपक कांबळे,अनिल पडवळ,राजू मगदूम,विजय मगदूम,समीर सनदी,योगेश निरगुणे, सुजय कांबळे,अमोल पाटील, रोहीत शिंदे,सुनिल गस्ते,शकुंतला कांबळे,नितिन भोसले,रंजना शिकलगार, रंजना कांबळे,रेखा कांबळे आदी उपस्थित होते.