भिलवडी येथे जायंटस् सेवा सप्ताह समारोप, बक्षीस वितरण, अनेकांचा सत्कार
उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती ; लोकांचा उत्साह अन् समाधान

भिलवडी:: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील जायंटस् सेवा सप्ताहाचा समारोप दि. २५ सप्टेंबर रोजी भिलवडी येथील जानकिबाई चितळे हॉल येथे बक्षीस वितरण सोहळ्याने उत्साहात पार पडला. यावेळी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले तसेच सरपंच पदी निवड झालेल्या स्मिता शेटे यांचा सत्कार करण्यात आला. सात दिवस विविध उपक्रम राबविल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधनी प्रशालेचे मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी, जायंटस वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी मेंबर उद्योजक श्री गिरीशजी चितळे, अध्यक्ष सुबोध वाळवेकर व सहेली ग्रुपच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर,सुनिता चितळे वहिनी, श्री महावीर चौगुले, भक्ती चितळे व उद्योजक श्री मकरंद चितळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दि 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहा दरम्यान मरणोत्तर नेत्रदान पोस्टरचे अनावरण, कृष्णा घाट स्वच्छता व संवर्धन मोहीम, वृक्षारोपण, विविध शाळांमध्ये औषधी वनस्पतींचे प्रदर्शन, रांगोळी, चित्रकला, मिनी मॅरेथॉन, गणपती स्तोत्रपठण, पसायदान पठण, अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये 700 ते 800 स्पर्धकांनी भाग घेतला तर विविध स्पर्धांमध्ये 60 स्पर्धकांनी बक्षीसे पटकावली. या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी भिलवडी शिक्षण संस्था, सन्मान शिक्षण संस्था, माळवाडी व क्षितिज गुरुकुल संस्था बुरुंगवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले.
या समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये वर्षभरामध्ये भिलवडी जायंटस ग्रुप मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांचा सत्कार पार पडला. यामध्ये नूतन सरपंच सौ सीमा शेटे, खंडोबा पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल श्री के आर पाटील सर, राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री विकास किणीकर सर, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शिवाजी कुकडे सर, प्रतिष्ठा राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ निलांबरी पाटील, आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीनिवास गुरव तसेच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी विश्वस्त म्हणून श्री भाग्येश चौगुले यांचे सत्कार करण्यात आले . हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जायंट्स ग्रुपच्या सर्व सभासदांनी मोलाचे योगदान दिले . सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे लोकांतून कौतुक होत आहे.