महाराष्ट्रराजकीय

मिरज विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाचा काँग्रेसचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार

गुगवाड येथे बौद्ध समाज बांधवांचा धम्म मेळावा ; उद्योगपती सी आर सांगलीकर आपला हक्काचा माणूस त्यांनाच निवडून देणार, लोकांच्या प्रतिक्रिया

 

 

मिरज : काँग्रेसचे नेते आणि उद्योगपती सी आर सांगलीकर यांना यावेळी मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करणार आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार असा निर्धार बौद्ध समाजातील लोकांनी केला.

मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज मतदार संघातील बौद्ध बांधवांनी गुगुवाड येथे धम्म मेळावा आयोजित केला होता. त्या बैठकीत त्यांनी ठाम निर्णय घेतला.

यावेळी अनेक बौद्ध बांधव, भगिनी यांनी काँग्रेसचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आणि विचाराच्या जोरावर प्रभावित होऊन त्यांचा आदर्श घेत आहे.  गेले अनेक वर्ष उद्योगपती सी आर सांगलीकर यांना आम्ही पाहत आहे. उद्योगपती सांगलीकर यांनी नेहमीच बौद्ध बांधवांच्या अडीअडचणी समजून घेतलेल्या आहेत. अनेक गरजू लोकांना त्यांनी मदत केलेली आहे, गरीब लोकांचे कल्याण करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. सामान्य लोकांशी नाळ जोडणारा माणूस. नेहमीच कोणत्याही क्षणी, अडीअडचणीला लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारा माणूस म्हणून सी आर सांगलीकर यांची ओळख आहे. उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी विविध माध्यमातून लोकांना रोजगार निर्मिती केली आहे कोणतेही राजकीय पद नसताना त्यांनी जनतेसाठी वाहून घेतलेला आहे त्यामुळे यापुढे आम्ही मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहे. असा निर्धार धम्म मेळाव्यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील बौद्ध समाजातील लोकांनी केला. 

यावेळी काँग्रेसचे नेते सी आर सांगलीकर यांनी सांगितले की, जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा वारसा जपून मी आजपर्यंत कार्य करत आहे बौद्ध बांधवांच्या विकासा ला चालना देण्याचा आपला पहिल्यापासून प्रयत्न आहे बौद्ध समाजातील लोकांना एकत्रित करण्यासाठी गुगवाड येथे मी धम्मभूमीची निर्मिती केली आहे. या माध्यमातून अनेक बौद्ध बांधव येथे विचारविनिमय करत आहेत. बौद्ध बांधव म्हणून माझ्या प्रति असलेली आपली तळमळ आणि आपले मत हे आपुलकी देणारे आहे.  हे मी कधी विसरणार नाही. नेहमीच तुम्ही माझ्यावर प्रेम केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मिरज मतदारसंघातील विकासासाठी मला एक वेळेस संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिक्षक मुजावर यांनीही लोकांना मार्गदर्शन केले आणि काँग्रेसचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांना मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी पुढाकार घ्या आणि त्यांच्या पाठीशी ठाम रहा,असे सांगितले.

या मेळाव्या दरम्यान मिरज मतदारसंघातील बौद्ध समाजातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यांनी आपल्या भावना उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्यासमोर स्पष्ट केल्या. तसेच बौद्ध बांधवांनी ही सी आर सांगलीकर यांच्या भूमिकेशी ठाम राहण्याचा निर्धार केला. या मेळाव्या वेळी महिलांचा आणि पुरुषांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!