महाराष्ट्र

काँग्रेस पक्षाचे नेते, उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा मिरज येथे मोहम्मद पैगंबर जयंती, ‘ईद-ए-मिलाद’च्या मिरवणुकीत सहभाग

उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे मुस्लिम बांधवांशी असलेल्या एकजुटीच्या विचाराने लोक भारावले

 

मिरज ; नेहमीच सर्व जाती धर्मातील लोकांच्या सुख दुःखात सहभागी काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी मिरज येथे मोहम्मद पैगंबर जयंती आणि ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जीवनात सांगितलेल्या मौलिक गोष्टींचे फलक सर्वत्र लावण्यात आले होते. या सर्व गोष्टींमधून धार्मिक तसेच सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला.मिरजमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा आहे.यावेळी शोभायात्रा काढण्यात आली यात उंट, घोडे तसेच विविध गाड्या सुंदर रीतीने सजवून  मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. पारंपरिक वेशभूषेत लहान मुले तसेच समस्त मुस्लिम समाज बांधवांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

काँग्रेस पक्षाचे नेते तथा उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी मोहम्मद पैगंबर जयंती आणि ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त मुस्लिम समाजाने काढलेल्या मिरवणुकीत सकाळपासून जातीने उपस्थिती दर्शविली होती. उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे मुस्लिम बांधवांशी असलेल्या एकजुटीच्या विचाराने लोक भारावून गेले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!