सलगरेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाळासाहेब होनमोरे यांनी केली पाहणी
मिरज प्रतिनिधी.
सततच्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे. द्राक्ष हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते.मात्र यावर्षी सततच्या पावसाने द्राक्ष बागेची फळ छाटणी घेण्यासाठी काडी परिपक्व न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी सलगरेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी व विचारपूस केली . बेभरवशाचा निसर्ग यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अवकाळी पावसाने या अगोदर बरेच नुकसान झाले होते. आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच बाळासाहेब होनमोरे यांनी थेट शेताच्या बांधावर येऊन भेट दिल्याने आम्हा सर्व शेतकऱ्यांना आधार मिळाला. असे शेतकरी कैलास कोष्टी म्हणाले.
यावेळी होनमोरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान देण्यात आलं नाही, शेती औषधे खतांचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकरी राजा फक्त पुढील वर्षी चांगल पिक उत्पादन येईल या आशेवर जगत आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचेही होनमोरे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असे अभिवचन बाळासाहेब होनमोरे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वास्कर आप्पा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकुनडे,कैलास कोष्टी ,अशोक बंडगर ,सहदेव कायपुरे, बबन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी संजय भोसले साहेब ,सर्जेराव साबळे, संतोष होनमोरे ,राजेंद्र कोष्टी, संजय कुमठेकर ,आदी शेतकरी उपस्थित होते.