शिव साम्राज्य तरुण मंडळ, जाधव पार्क जीवबानाना नगर आयोजित ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात
रक्तदान, खाऊ वाटप भाषण स्पर्धांसह विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर: अनिल पाटील
शिवसाम्राज्य तरुण मंडळ, जाधवपार्क,जिवबानाना नगर , कोल्हापूर आयोजित ७९वा भारतीय स्वातंत्र दिन विविध उपक्रमा द्वारे साजरा करण्यात आला. यावेळी खाऊ वाटप,भाषण स्पर्धा, रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण अशोकराव जाधव (सेवानिवृत्त सहायक पोलीस उपायुक्त मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मंडळाचे आधारस्तंभ उद्योजक श्रीकांत पाटील माजगावकर, राजन पवार, ज्येष्ठ पत्रकार एन. एस. पाटील, इंगळे सरकार, रेडेकर साहेब, मुख्याध्यापक रमेश पाटील मेजर पोपटराव आदी मान्यवर उपस्थित होते.
अशोकराव जाधव म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य दिन हा देशभर राष्ट्रीय सण साजरा केला जातो. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे झाली. ज्या हुतात्म्यानी आपल्या प्राण्याची आहुती देऊन इंग्रजांच्या जखडातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा व हे स्वातंत्र्य जपण्याचा सर्वानी सलोख्याने बंधुभावाने वागण्याचा आजचा हा सुवर्णदिन आहे. या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या घटनेने दिलेल्या चतुसूत्रीचं आपण संगोपन कडून आपल्या देशाचा स्वातंत्र्य हे आबाधित राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहण्यास सर्वांना मी आवाहन करतो.
मुख्याध्यापक रमेश पाटील म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून स्वातंत्र्य जपण्यासाठी देश सीमेवरील जवान व आपणा सर्वांच्या सेवेसाठी नेहमी कटिबद्ध असणारे पोलीस खाते यांच्या योगदाना मुळेच आपण निर्धास्त व आनंदी जीवन जगत असल्याने त्यांनी मनापासून आभार मानत आपण सदैव त्यांचे ऋणी असल्याचे सांगितले.
. यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदारक्तदात्यांना रक्तदात्यांना सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपयुक्त मुंबई अशोकराव पाटील मंडळाचे आधारस्तंभ श्रीकांत पाटील माजगावकर ज्येष्ठ पत्रकार एन.एस. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा त्यांना गौरवण्यात आले.
यावेळी संध्या निमकर व सागर निमकर या पती पत्नी बरोबरच जीव बानाना ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक मेजर पोपटराव तसेच फौजी अजित घारे तसेच , सरिता साठे , कमल पाटील, सागर जितकर, सुरेखा चौगले,मनोज भाट आदी रक्त दात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी साठी श्री साई ब्लड बँक सेंटर गारगोटी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णात साठे, जयश्री साठे, साक्षी भारमल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उपस्थितांना उद्योजक श्रीकांत पाटील (माजगावकर) यांनी अल्पो पहारची सोय केलेली होती. कार्यक्रमास श्रेयस माजगावकर, विनायक गुरव,एस.एस.शिरोडकर , ऋतुराज भोसले,जी.व्ही. सामंत,महाम्मुद मुलानी, रमेश पाटील आदी मान्यवर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वागत कृष्णात साठे यांनी केले तर रमेश जाधव यांनी आभार मानले.