निढोरी येथे देवानंद दादा पाटील यांच्या संकल्पनेतून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):- कागल तालुक्यातील निढोरी येथे देवानंद दादा पाटील यांच्या संकल्पनेतून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.*
*गेली अनेक वर्षे भीम जयंती देवानंद दादा साजरी करत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातला हा असा एक नेता आहे जो बहुजन समाजाला बाबासाहेब समजले पाहिजे हा मानस मनाशी बाळगून दलित समाजात जयंती न करता गावाच्या मध्य ठिकाणी जयंती साजरी झाली पाहिजे आणि बहुजनांना बाबासाहेब समजले पाहिजे.हा विचार देवानंददादा गेली अनेक वर्ष राबवत आहेत. निढोरी मध्ये अनेक दिग्गज माणसांना आणून परिवर्तनाचं चक्र देवानंद दादा फिरवत आहेत.*
*_📘ऐैसा देवानंद पाटील पुन्हा होणे नाही_📚*
*अनेक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना शाश्वत विकासाची गरज पटवून दिली. महाराष्ट्र ही शिव,शाहु,फुले आंबेडकरांची भुमी आहे. संतांच्या परंपरेनेही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात नक्कीच भर पडली आहे.म्हणूनच संतांचा, महापुरूषांचा,महात्म्यांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहचावा,त्यांच चरित्र समाजापर्यंत पोहोचावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुरोगामीत्वाची पक्की बैठक असलेल्या देवानंद दादा पाटील यांनी अंदाजे २०० भर व्याख्याने आयोजित करून समाजाच्या विचाराची दिशा स्पष्ट करून दिली.