दुधोंडी येथे मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, उत्साहात
खासदार विशाल पाटील यांची उपस्थिती ; लोकनेते जे के बापू जाधव यांचे कौतुक : विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

पलूस: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील कृष्णाकाठ उद्योग समूहाचे व मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक लोकनेते, सहकार महर्षी जे के बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि उत्साहात संपन्न झाली. यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील व विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार उत्तर देताना विशाल पाटील म्हणाले, की गेल्या काही वर्षापासून सांगली जिल्ह्याचा विकास नाही, याची मला जाणीव असून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे प्रेम माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यावर घरावर असल्याने मी निवडणूक जिंकली.मी वसंतदादा पाटील यांचा नातू असल्याने सांगली जिल्ह्याच्या विकास कामात मी कुठलीही कमतरता करणार नाही. काही लोक म्हणाले, की खासदारांना इंग्लिश बोलता येत नाही, त्यामुळे मी अधिवेशनामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषेचा वापर केला. यापुढे कन्नड भाषेचा अभ्यास करून तेही बोलणार आहे. जे के बापू जाधव यांनी नेहमीच समाजकारणाचा विचार केला आहे. दुधोंडी गावच्या विकासासाठी नेहमीच ते प्रयत्न करत असतात. मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँक आणि इतर संस्थाही जे के बापू जाधव व सुधीर भैय्या जाधव यांनी चांगल्या चालवल्या आहे. लोकांचे हित पाहून त्यांनी जास्तीत जास्त लोकांना सहकार्य केले आहे. दुधोंडी गावांनी मला दिलेलं सहकार्य मी कदापि विसरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विविध मान्यवर सत्कार करण्यात आला. यामध्ये खासदार विशाल दादा पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या कुलगुरू पदी निवड झालेल्या डॉ. ज्ञानदेव मस्के, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या महासचिवपदी बी एन पवार, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभाग महासचिव पदी डॉ शिवलिंग मेनकुदळे, रामानंद नगर येथील प्राचार्य पदी डॉ उज्वला पाटील, राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेच्या उपाध्यक्षपदी मारुती चव्हाण, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातदार संघ पुणे संचालक पदी शहाजी मोरे, प्रदीप पाटील, संजयराव भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थापक जे के बापू जाधव यांनी सभासदांच्या भरोशावर बँक चाललेली आहे. बँकेचे कारभारात अनेक लोकांचे सहकार्य लाभत आहे असेही त्यांनी सांगितले.
चेअरमन सुधीर भैय्या जाधव यांनी मानसिंग बँकेच्या धोरणाचा आणि प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी व्हाईस चेअरमन दौलत लोखंडे, एंथोनी डिसोझा, उत्तम वाळवेकर, जनरल मॅनेजर संभाजी जाधव, उद्योजक सतीश आबा पाटील, विजय अरबुणे, क्रांतीकुमार आबा जाधव, नागराज रानमाळे, शहाजी जाधव, विविध शाखेतील अधिकारी, कर्मचारी ,दुधोंडी गावातील ग्रामस्थ, सभासद , खातेदार आदी उपस्थित होते.