ग्रामीणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
रामानंदनगर येथे रेल्वे विभागाने केलेल्या चुकीच्या कामांविरोधात लोकनेते जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
रेल्वेच्या विविध कामाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह अनेक गावांतील लोकांचा सहभाग

दर्पण न्यूज पलूस :- रामानंदनगर येथे रेल्वे विभागाने केलेल्या चुकीच्या कामासंदर्भात तसेच तुपारी, दह्यारी, घोगाव, दुधोंडी, पुणदी, नवी पुणदी, नागराळे, रामानंदनगर, बुर्ली सावंतपूर इतर गावाच्या रेल्वेच्या विविध कामाच्या मागणीसाठी किर्लोस्करवाडी रेल्वे फाटक या ठिकाणी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मा जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले,
यावेळी तुपारी, दह्यारी, घोगाव, दुधोंडी, पुणदी, नवी पुणदी, नागराळे, रामानंदनगर, बुर्ली व ईतर गावातीलप्रमुख मान्यवर, ग्रामस्थ व प्रमुख पदाधिकारी आणि डॉ पतंगराव कदम महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.