महाराष्ट्र

बुद्धवासी अजित (भैय्या) तिरमारे यांच्या स्मृती दिनानिमित्त दुधोंडीत शालेय साहित्य वाटप

_इंजी.निलेश अजित तिरमारे, RPI नेते विशाल तिरमारे यांचा कौतुकास्पद उपक्रम

 

दुधोंडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील *दुधोंडी गावचेसुपुत्र, दुधोंडी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य, आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे नेते, कालकथित अजित (भैय्या) तिरमारे यांच्या सोळाव्या स्मृती दिनानिमित्त इंजिनियर निलेश अजित तिरमारे व आरपीआयचे पलुस कडेगांव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे यांच्यावतीने जिल्हा परिषद मराठी मुला – मुलींच्या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन भीमशक्ती ग्रुपच्या वतीने करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.*

*यावेळी बोलताना आरपीआयचे विशाल तिरमारे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना मदतीचा हात मिळावा या एका उद्देशाने सदरचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. इथून पुढच्याही कालावधीत अशाच पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गोरगरीब मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असल्यास संपर्क साधावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल भाऊ तिरमारे यांनी केले.*

*यावेळी आरपीआयचे विशालभाऊ तिरमारे,निलेश तिरमारे,रमजान मुजावर,सागर तिरमारे,संदीप तिरमारे, अक्षय तिरमारे,अजिंक्य तिरमारे,वैभव तिरमारे,अक्षय प्रभाकर तिरमारे,सुमित तिरमारे, आदित्य तिरमारे, कुणाल तिरमारे, ओम तिरमारे, मंदार तिरमारे, काजल सोंडे, ज्योत्स्ना तिरमारे, ऋतुजा तिरमारे,अंकिता तिरमारे, स्नेहल तिरमारे, ज्योती तिरमारे, हर्षदा तिरमारे, शुभांगी तिरमारे, वर्षा तिरमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!