व्यापारी संघटना भिलवडीच्या स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण, सायकल स्पर्धा, होड्यांच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती गिरीश चितळे; युवा नेते उद्योजक सतीश आबा पाटील व मान्यवरांची उपस्थिती

भिलवडी व्यापारी संघटने मार्फत स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण, सायकल स्पर्धा व होड्यांच्या स्पर्धा संपन्न
भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे
प्रतिवर्षाप्रमाणे स्वातंत्र्यदिनी दहावीतील सर्वात जास्त गुण मिळवलेला विद्यार्थी चिरंजीव पुष्कर राजू आरते याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक श्री गिरीश चितळे होते, त्याचप्रमाणे उद्योजक श्री डीसी पाटील, माजी सरपंच विजयकुमार चोपडे, श्री मोहन पाटील, शहाजी गुरव, विलास अण्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा ही कार्यक्रमही घेण्यात आला, व त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या व सायकलच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक कृष्णामाई घाटावरती होड्यांच्या शर्यतीचे देखणे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 11 होड्या सहभागी झाल्या होत्या, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भिलवडीकर मोठ्या संख्येने घाटावरती उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस तरुण मराठा बोट क्लब सांगलवाडी यांनी रुपये 15001 उद्योजक श्री गिरीश चितळे, उद्योग समूह यांचे मार्फत देण्यात आले .
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सप्तर्षी बोट क्लब कवठेपिरान रुपये 11001 वाळवेकर हॉस्पिटल सांगली, डॉ. रवींद्र वाळवेकर यांचे मार्फत, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्रीजी बोट क्लब (अ )कसबे डिग्रज रुपये 9001 निकम शॉपी, निकम फिटनेस क्लब, भूमिज अर्थमूव्हर्स,गोविंद गोशाळा त्यांचे मार्फत देण्यात आले. तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस राजू दादा पाटील, पाटील डेअरी यांचे मार्फत रुपये 7001 होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना डांगे कन्स्ट्रक्शनच्या सुरेश डांगे यांचे मार्फत शिल्ड देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भगवानराव पालवे, सरपंच सौ विद्या पाटील, एम आर पाटील सर, युवा नेते उद्योजक सतीश आबा पाटील, निखिल पाटील, बाळासो मोहिते, महावीर चौगुले, विजय पाटील, जगदीश माळी, तुषार पाटील पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी,संचालक व सभासदांनी प्रचंड मेहनत घेतली.